सांगली : महाराष्ट्रातलं ग्रहण आणि देशाला लागलेलं ग्रहण महाराष्ट्राच्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे. अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपावर टीका केली आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे “भारत जोडो” निमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
सूर्यग्रहणावरुन बोलताना कदम यांनी, “मला कोणीतरी सांगितलं की आज सूर्यग्रहण आहे. पण मी म्हणालो मला त्याची फिकीर नाही, कारण देशाला आणि महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण हे आपल्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे”. अशा शब्दात राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकार आणि देशातल्या मोदी सरकारवर टीका केली आहे.