दरम्यान, ‘पवारसाहेबांनी लोकांचं हे प्रेम कमावलं आहे. राज्यभरातील कार्यकर्ते आज साहेब, दादा आणि ताईंना भेटण्यासाठी आले असून त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे. हाच उत्साह आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतो,’ अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली.
Home Maharashtra diwali padwa in baramati, पवार समर्थकांनी गोविंद बाग फुलली; आवडत्या नेत्याला दिवाळी...
diwali padwa in baramati, पवार समर्थकांनी गोविंद बाग फुलली; आवडत्या नेत्याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी रांगा – a large crowd of supporters gathered at govind bagh residence in baramati to wish ncp president sharad pawar on diwali padwa
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींकडून बारामती येथे साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यानिमित्ताने पवार यांचे राज्यभरातील समर्थक त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथील गोविंद बागेतील निवासस्थानी मोठी गर्दी करतात. आजही या ठिकाणी आपल्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे.