मुंबई : देशात ‘महाकाल कॉरिडोर’ आणि इतर धार्मिक ‘कॉरिडोर’च्या धर्तीवर मुंबईतील मुंबादेवी आणि पंढरपूर येथे ‘कॉरिडोर’ची निर्मिती करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. या योजनेत दोन्ही देवळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, परिसराचा विकासही होणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.

परिसराचा विकास

दिवाळीच्या निमित्ताने फडणवीस यांनी मंगळवारी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवला होता. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन प्रमुख देवस्थानांबाबत माहिती दिली. कॉरिडोरच्या माध्यमातून मुंबादेवी आणि पंढरपूरच्या देवळांच्या भव्य जीर्णोद्धारासह विस्तीर्ण उद्याने, मोकळ्या जागा, परिसराचे सुशोभीकरण, मूलभूत सोयीसुविधा तयार केल्या जाणार आहेत. या दोन्ही परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही देवस्थानांच्या स्थळी भाविकांना व पर्यटकांना पोहोचण्यासाठी चांगल्या दर्जाच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ग्रहण लागणार? नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्यामुळे खळबळ
मंत्रीमंडळ विस्तार लवकरच

देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे संकेत देऊन लवकरच राज्यमंत्र्यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिसांना बोनस देण्याच्या मागणीसंदर्भातही त्यांनी या वेळी भाष्य केले. ‘गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात पोलिसांना कधीच बोनस देण्यात आलेला नाही. आताच अचानकपणे ही मागणी करण्यात आली,’ असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. पोलिसांना देण्यात येणारे भत्ते आणि सुट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘सरकार मदत करणारे’

‘नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तर इतकेच नव्हे तर काही दिवसांचा पाऊस वगळता आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीची मदत राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली असून सात हजार कोटींची मदत आतापर्यंत देण्यात आली आहे. आमचे सरकार मदत करणारे आहे,’ असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबई महानगरपालिका निवडणुका केव्हा होतील, याबाबत पत्रकारांनी विचारला असता, ‘याबाबत आपण काहीच भाष्य करू शकत नाही. पालिका निवडणूक केव्हा होतील हे एक तर देव सांगू शकतो किंवा न्यायालय सांगू शकतो,’ असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

मुंबईकरांनो सावधान! ऐन दिवाळीत नवं संकट, ‘या’ भागांमध्ये धोका वाढला
असा होणार प्रकल्प

– पर्यटक आणि भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या अद्ययावत निवासस्थानाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

– याशिवाय पर्यटक आणि भाविकांच्या मनोरंजनासाठी भव्य उद्याने, लेझर शो असतील.

– संबंधित देवस्थानांबाबतचे माहितीपट बनवून ते दाखविण्याची सोय केली जाईल. याबरोबरच स्वच्छ व चांगल्या प्रसाधनगृहांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

– पंढरपूर आणि मुंबईदेवी येथे सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत.

राज्यात वीज मागणीत आश्चर्यकारक घट, ऐन दिवाळीतही मुंबईचा आकडा वाचून थक्क व्हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here