मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधील रहिवासी अमू हाजी याचा मृत्यू झाला आहे. त्याचे वय ९४ वर्ष होते. जगातील सर्वात घाणेरड्या माणसाचा जागतिक विक्रम अमू हाजीच्या नावावर झाला. अर्धशतकाहून अधिक काळ अमू हाजीने पाण्याला हातही लावला नाही, स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली नाही. कधीही अंघोळ न करण्यामागील कारण म्हणजे चुकून आंघोळ केली तर आजारी पडण्याची भीती अमू हाजीला होती. कदाचित तो याबद्दल बरोबर होता, मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी लोकांनी त्याला पकडून आंघोळ घातली होती, त्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली आणि गेल्या रविवारी त्याचा मृत्यू झाला. (Iran Dirty Man Die)
इराणच्या एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अमू हाजीवर ‘The Strange Life Of Amou Haji’ नावाची डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, अगदी लहान वयात अमू हाजीने स्वतःला संसार आणि लोकांपासून वेगळे केले होते. अनेक विक्रमांसह अमू हाजीचा आहारही तितकाच विचित्र होता. अमू अपघाताने किंवा नैसर्गिकरित्या मारल्या गेलेल्या प्राण्यांचे कुजलेले मांस खात असे. त्याला मांसाहार जास्त आवडायचा. जनावरांच्या कुजलेल्या मांसाव्यतिरिक्त, अमूला घाणेरड्या कुजलेल्या घरगुती भाज्यांचा कचरा देखील आवडायचा.