कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर आता थंडीने आपली बॅटिंग सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तपमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. सकाळी व रात्रीच्या थंडीने अंगात हुडहुडी भरत असून आज बुधवारी सकाळी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले असल्याने थंडी अधिक जाणवत होती. यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरच शेकोटी करत, चहाचा आस्वाद घेताना पहायला मिळत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात हेच तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साधारण ऑक्टोबरच्या दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यापासून परतीच्या पाऊस संपून थंडीला सुरुवात होत असते. मात्र, यंदा ऑक्टोबर संपत आला तरी परतीचा पाऊस काय थांबत नाही. पाऊस ही दिवाळी करून जाणार असे वाटत असताना अचानक गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली असून पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी लागू लागली आहे. शिवाय दिवसभर सूर्य नारायणाचे दर्शन होत असताना ही वातावरणात थंडी जाणवू लागली आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ग्रहण लागणार? नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्यामुळे खळबळ
जिल्ह्याचे किमान तपमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. मंगळवारी सकाळी तर अंगात हुडहुडी भरत होती. नदी, विहीर, ओढ्याच्या काठावरून जाताना अंगावर काटा येत आहे. साधारणतः: सकाळी साडेआठ पर्यंत वातावरणात गारठा जाणवत आहे शिवाय दिवसभर ही हा गारठा जाणवतो सायंकाळी साडेसहानंतर पुन्हा थंडी जाणवू लागला.

रात्री त्यामध्ये वाढ होत गेली. यामुळे ठिकठिकाणी पहाटे फिरायला आणि व्यायमसाठी जाणाऱ्या लोकांनी आता रस्त्याच्या कडेला शेकोटी करत गरम चहाचा आस्वाद घेताना पहावयास मिळत असून ऐन दिवाळीत मोठ्या प्रमाणत थंडी वाढू लागल्याने अनेक जण दिवसभर स्वेटर आणि उबदार कपडे परिधान करत आहेत. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबईकरांनो सावधान! ऐन दिवाळीत नवं संकट, ‘या’ भागांमध्ये धोका वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here