तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत आणि स्वस्त रेशनची सुविधा देशभरात घेऊ शकता. देशातील करोडो लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असल्याची UIDAI ने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
UIDAIचे ट्विट
देशात आधार जारी करणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) म्हणते की, आता तुम्ही देशभरात आधारद्वारे रेशन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले की, आता तुम्ही आधारच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकता, पण यासाठी तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. वन-नेशन-वन-आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.
तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइट https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ द्वारे देखील आधार केंद्र शोधता येईल.
टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता
आजच्या काळात तुम्ही तुमच्या घरातील कामापासून बँकेपर्यंतची सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक १९४७ वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला आधारशी संबंधित सर्व माहिती मिळेल.