Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Oct 2022, 11:21 am

Crime News : काचेच्या ग्लासचे तुकडे हवेत उडाल्यानंतर काचेचा एक तुकडा एका वाटसरुच्या घशात घुसला आणि तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली आहे.

 

India Crime News
काचेच्या ग्लासमध्ये ठेवून फोडला फटाका; काचेचा तुकडा घशात घुसला अन्…

हायलाइट्स:

  • काचेच्या ग्लासमध्ये ठेवून फोडला फटाका
  • काचेचा तुकडा वाटसरुच्या घशात घुसला
  • काचेचा तुकडा घशात घुसल्यामुळे एकाला जीव गमवावा लागला
बदायूं: उत्तर प्रदेशातील बदायूंमधील जरीफनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गावात एका तरुणाने काचेच्या ग्लासमध्ये फटाका ठेऊन फोडला. फटाका फुटल्यानंतर काचेच्या ग्लासचे तुकडे हवेत उडाले आणि त्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

काचेच्या ग्लासचे तुकडे हवेत उडाल्यानंतर काचेचा एक तुकडा एका वाटसरुच्या घशात घुसला आणि तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील जरीफनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मोरुबाला या गावातील आहे.

जावईबापू ब्रिटनच्या पंतप्रधानपदी; मिलिंद नार्वेकरांचा सासूबाईंना फोन, म्हणाले सुधाजी…
झाले असे की, फटाका फुटल्यानंतर काचेचा एक तुकडा गावातीलच छत्रपाल (वय ३८) या व्यक्तीच्या घशाला घुसला. काचेचा तुकडा घशात घुसताच छत्रपालच्या घशातून रक्त येऊ लागले. त्यानंतर छत्रपाल जागेवरच कोसळला हे पाहून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. याची माहिती मिळताच छत्रपालचे कुटुंबीय तेथे पोहोचले आणि त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या छत्रपालला सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, जखमीची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला अलिगढ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. जखमी छत्रपाल यांचा अलिगढला जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजलं!

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here