Raj Thackeray : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं टाळ वाजवत विठुरायाचे नामस्मरण करत दाखल झाली होती. यावेळी राज ठाकरेंनी त्या लहान मुलांना खाऊ वाटप करुन, त्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

दरम्यान, आज दिवाळी पाडवा असल्यानं राज्याच्या विविध भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी आली होती. विठुरायाचे नामस्मरण करत ही मुल शिवतिर्थावर दाखल झाली होती. यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना फराळाचं वाटप केलं. यावेळी या मुलांबरोबर त्यांचे नातेवाईकांसह महंत देखील उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकडून राज ठाकरेंना निवेदन  

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात ही मुलं राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतिर्थावर दाखल झाली होती. यावेळी नाशिकचे महतं देखील उपस्थित होते. यावेळी या महंतांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. तसेच यावेळी लहान मुलांनी राज ठाकरेंना काही मागण्यांचं निवेदनही दिलं. यावेळी लहान मुलांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत असी विनंती देखील राज ठाकरेंना करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी राज ठाकरेंना करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी राज ठाकरेंनी प्रयत्न करावेत 

यावेळी राज ठाकरेंनी मुलांना किराणा माल देखील दिल्याची माहिती मुलांनी सांगितली. त्यांनी आम्हाला शालेय वस्तुंचं देखील वाटप केलं. राज ठाकरेंना चांगलं आरोग्य मिळो अशी प्रार्थना देखील यावेळी लहान मुलांनी केली. त्यांच्या हातून अशीच लहान मुलांची सेवा घडावी अशी इच्छा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी राज ठाकरेंनी प्रयत्न करावेत, जेणेकरुन शेतकऱ्यांची मुलं उघड्यावर पडणार नाहीत असे मतही यावेळी मुलांबरोबर आलेल्या नातेवाईकांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळं अनेक मुलं अनाथ झाली आहेत. त्यानंतर ही मुलं इगतपुरीच्या अनाथ आश्रमात आहेत. त्या ठिकाणी त्यांचे संगोपण करत असल्याची माहिती देण्यात आली. 

  महत्त्वाच्या बातम्या:

Raj Thackerays Letter to Maharashtra CM : ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्या; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here