Help Flood Affected Farmers : ‘एबीपी माझा’च्या आवाहनाला साथ देत बीडमधील (Beed) अंबाजोगाई येथील डॉक्टरांनी 50 मुलांची दिवाळी गोड केली आहे. सध्या देशात दिवाळीची धामधूम पाहायला मिळतेय. सर्वजण दिवाळी उत्साहात साजरी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचं पिक जाऊन मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनतेनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करत त्यांची दिवाळी गोड करण्याचं आवाहन एबीपी माझीच्या वतीने करण्यात आलं. या उपक्रमाला अंबाजोगाईतील डॉक्टरांची साथ लाभली आहे. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आणि गरीब गरजू मुलांची दिवाळी गोड करा असा आवाहन एबीपी माझा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना केलं होतं याचं आवाहनाला प्रतिसाद देत, अंबाजोगाईतल्या एका तरुण डॉक्टराने 50 मुलांची दिवाळी गोड केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातल्या चंदनवाडी येथील डॉक्टर धनराज गीते यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन पन्नास गरीब आणि गरजू मुलांना नवीन कपडे घेऊन दिले आणि त्यांना फराळाचं वाटप देखील केलं आहे. एबीपी माझाने शेतकरी आणि गरीब मुलांची दिवाळी गोड करा असा आवाहन महाराष्ट्रातल्या जनतेना केलं होतं. याचं आवाहनाला धनराज गीते यांनी साथ दिली असून गरीब आणि गरजू मुलांच्या चेहऱ्यावर त्यांनी दिवाळीनिमित्त हास्य फुलवलं आहे.

‘एबीपी माझा’ने औरंगाबाद येथील गंगापूरच्या ऋषिकेश चव्हाण या शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा महाराष्ट्र समोर मांडली होती. पावसानं हातचं पिकं हिरावून घेतल्याने या शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जात होती. या व्यथा मांडणारा शेतकरी कुटुंबाचा आणि त्यातील चिमुकल्याचा व्हिडीओ एबीपी माझाने दाखवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शेतकऱ्याची व्यथा पाहून ऋषिकेशला मदतीचा ओघ सुरू झाला. अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येत ऋषिकेशच्या कुटुंबाला मदत करत त्यांचीही दिवाळी गोड केली. 

पाहा व्हिडीओ : पूरग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा ऋषिकेश चव्हाणला मदतीचा हात

‘किमान एका कुटुंबाची दिवाळी गोड करा’, एबीपी माझाचं आवाहन

राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक कुटंबं उद्धवस्थ झाली आहेत. बळीराजा आज संकटात आहे. महाराष्ट्रातील जनतेनं आपला दानशूरपणा, संवेदनशीलपणा दाखवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किमान एका कुटुंबाची दिवाळी गोड करावी असं आवाहन एबीपी माझानं करत आहे. एबीपी माझानं शेतकऱ्यांना मदतीचं, त्यांची दिवाळी गोड करण्याचं आवाहन केलं आहे.  शेतकऱ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम आपण करावं. या संकट काळात शेतकऱ्यांची दिवाळी गोड करत आनंद साजरा करुयात, असं आवाहन एबीपी माझानं केलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here