पालघर : बोईसर-चिल्हार मार्गावर बोईसर खैराफाटक येथील रेल्वे उड्डाणपुलावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून रियांश शिंदे असं या चिमुकल्याचं नाव आहे, तर दुचाकीवरून जाणारे पती-पत्नी देखील जखमी झाले आहेत.
या अपघातात बुलेटवरील पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर लाइफ लाइन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बोईसर पोलिसांनी अपघाग्रस्त ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे.