नवी दिल्ली: गुगल सर्च इंजिन चालवणारी जगातील आघाडीची टेक कंपनी अल्फाबेटच्या खराब निकालांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. गुगलचा सर्च अॅडव्हर्टायझिंग बिझनेस कमी झाला असून, त्यानंतर टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अल्फाबेटच्या निराशाजनक निकालानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कमी झाल्याने मंदीचे संकट अधिक बळकट झाले आहे. २०२२ च्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा महसूल केवळ ६ टक्क्यांनी वाढून ६९.१ बिलियन डॉलर झाला.

दिवाळीच्या तोंडावर कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार
९ वर्षानंतर सर्वात निराशाजनक कामगिरी
करोना संसर्गाचा कालावधी वगळता २०१३ पासून अल्फाबेटचा वाढीचा दर सर्वात कमी वेगाने वाढला आहे. तज्ज्ञांनी ९ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता, जो केवळ ६6 टक्के दराने वाढला आहे. दरम्यान, केवळ अल्फाबेटच नाही तर मायक्रोसॉफ्टनेही तंत्रज्ञान क्षेत्राची चिंता वाढवली आहे. कंपनीने म्हटले की सर्वात मोठी मंदी त्यांच्या क्लाउड व्यवसायात दिसून येते. यापूर्वी मंदीचा शोध व्यवसायासह क्लाउड कंप्युटिंगवर परिणाम होणार नसल्याचे असे मानले जात होते. पण आर्थिक विकासातील घसरणीचा परिणाम या टेक कंपन्यांवरही होऊ लागला आहे.

डॉलरने अख्ख्या जगाच्या खिशाला कात्री लागणार? रुपयासह इतर चलने घसरली, जगाची चिंता वाढली
अमेरिकी टेक कंपन्यांचे वाईट निकाल
अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्टच्या निराशाजनक निकालांमुळे दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये ६ ते ७ टक्क्यांची घसरण झाली. निकाल जाहीर केल्यानंतर अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जाहिरात बाजार सध्या कठीण टप्प्यातून जात असल्याचे गुंतवणूकदारांना सांगितले. तसेच युट्युबच्या जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्नही २ टक्क्यांनी घटून ७.१ अब्ज डॉलर झाले असून विश्लेषक ४.४ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करत होते. २०२० नंतर कंपनीच्या जाहिरात विक्रीतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

पुढील १२ महिन्यांत भारतात मंदी येऊ शकते; सीईओंनी व्यक्त केली भीती
अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात
डिजिटल जाहिरातींची घसरण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील संकटाकडे बोट दाखवत आहे. महागाई शिगेला पोहोचली असताना कंपन्या डिजिटल जाहिरातींवर खर्च करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता कंपन्यांचे लक्ष खर्च कमी करण्यावर आहे. गुगलच्या निराशाजनक निकालांमुळे आज जाहीर होणार्‍या फेसबुकची मूळ कंपनी मेटा यांच्या निकालाबाबतही चिंता वाढली आहे. मेटा देखील डिजिटल जाहिरातींच्या कमाईवर अवलंबून आहे.

नोकर भरतीत घट
दुसरीकडे, टेक कंपन्यांच्या खराब निकालाचा परिणामनोकर भरतींवरही होणार आहे. अल्फाबेटने म्हटले की ते आपल्या नोकर भरतीच्या योजनेत ५० टक्क्यांहून अधिक कपात करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here