Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Oct 2022, 2:39 pm

Aurangabad News : पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरु केले असून चोरी करणाऱ्या ट्रकवर कोणताही नंबर नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. मोंढा नाका परिसरातील हत्येच्या घटनेनंतर दुसऱ्या घटनेत मिटमिटा येथे रेल्वे पट्ट्याजवळ एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याची दुसरी घटना घडली आहे.

 

Maharashtra Crime News
ऐन भाऊबीजेच्या दिवशी दोन हत्याकांड, घटनेनं औरंगाबाद हादरलं

हायलाइट्स:

  • दोन विविध ठिकाणी दोन जणांची हत्या
  • ऐन दिवाळीत हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
  • औरंगाबादमधील धक्कादायक घटना
औरंगाबाद : शहरात दोन विविध ठिकाणी दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मोंढा नाका परिसरात एका गोडाऊन शेडमध्ये चोरट्याने वॉचमन पाशा मोगल (वय ७२, रा. बंडा नाका परिसर) म्हणून काम करणाऱ्या वॉचमनला खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर चोरट्याने या गोडाऊनमधून आशीर्वाद पीठाच्या गोण्या तसेच अन्य काही वस्तू एका ट्रकमध्ये चोरुन नेले. या घटनेत सदर वॉचमनला चोरट्यांनी मारहाण करुन त्याची हत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरु केले असून चोरी करणाऱ्या ट्रकवर कोणताही नंबर नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. मोंढा नाका परिसरातील हत्येच्या घटनेनंतर दुसऱ्या घटनेत मिटमिटा येथे रेल्वे पट्ट्याजवळ एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याची दुसरी घटना घडली आहे. ऐन दिवाळीमध्ये जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम, राष्ट्रवादीच्या रुपालीताई-मनसेच्या वसंत तात्यांची भाऊबीज

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here