वाचा:
मंत्री मुश्रीफ यांचा एक सर्मथक आजारी होता. त्याची विचारपूस करण्यासाठी ते त्याच्या घरी गेले. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जनतेला भेटल्यास पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढायला नको म्हणून मुश्रीफ स्वत:च होम क्वारंटाइन झाले. या आठवड्यात ‘साहेब’ कुणालाही भेटणार नाहीत, असे निवेदन काढण्यात आले आहे. पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एका आमदारांनंतर मंत्री क्वारंटाइन होण्याची कोल्हापुरातील ही पहिलीच घटना आहे.
वाचा:
दरम्यान, मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना सातत्याने जनतेत राहावे लागते. करोना साथीत हा जनसंपर्क कमी झाला असला तरी महत्त्वाचे काम असले तर घराबाहेर पडावेच लागते. शिवाय मंत्री असल्यास आढावा बैठका, विभागाच्या बैठका यासुद्धा नियमित घ्याव्या लागतात. त्यातूनच सरकारमधील काही मंत्र्यांना करोनाचा सामना करावा लागला. सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री यांना करोनाने गाठले होते. त्यांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री करोनाच्या विळख्यात सापडले. चव्हाण यांनी तातडीने नांदेडहून मुंबई गाठली व वेळीच उपचार झाल्याने करोनाला हरवून ते ठणठणीत बरे झाले. त्यापाठोपाठ सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाविरुद्ध लढा द्यावा लागला. मुंडे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार झाले आणि त्यांनी ११ दिवसांत करोनाला हरवले. हे तिन्ही मंत्री करोनावर मात करून पुन्हा एकदा आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. त्याचवेळी सरकारमधील दोन मंत्र्यांवर आतापर्यंत क्वारंटाइन होण्याची वेळ आली. प्रथम महसूल मंत्री यांनी स्वत:ला क्वारटाइन करून घेतले होते. थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. थोरात यांच्यानंतर आता मुश्रीफ क्वारंटाइन झाले आहेत.
वाचा:
कोल्हापुरने गाठला नवा उच्चांक
करोना बाधितांच्या आकड्याने जिल्ह्यात बुधवारी उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल १३२ करोना बाधित आढळल्याने आतापर्यंतचा आकडा पंधराशेच्यावर पोहोचला आहे. दिवसभरात पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसात रोज ४० ते ५० करोना बाधित सापडत होते. मात्र बुधवारी हा आकडा १३२ पर्यंत गेला. शहरात ३४, करवीर तालुक्यात २५ तर इचलकरंजी परिसरात ३८ रूग्ण सापडले. शहरातील वारे वसाहत व टिंबर मार्केट हॉटस्पॉट बनले आहेत. रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने रूग्णालये अपुरी पडत आहेत. उपचार करण्याची सरकारी रुग्णालयाची क्षमता संपली आहे. खासगी रूग्णालये उपचार करण्यास नकार देत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times