सातारा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते यांच्या गावीच शासकीय कॉटेज हॉस्पिटल येथील कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी लागत असेल तर यापेक्षा दुदैव काय. यावरुनच साताऱ्यातील कोविड परिस्थितीची ‘शितावरुन भाताची परीक्षा’ करता येते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आज केली. ( Criticizes State Government )

वाचा:

प्रवीण दरेकर यांनी आज साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर वऱ्ये गावातील सावकार आयुर्वेदिक कॉलेज येथील क्वारंटाइन सेंटरला भेट दिली. यावेळी आमदार उपस्थित होते. दरेकर यांनी शिरवळ येथील तपासणी नाक्याची व्यवस्था पाहिली. तसेच साताऱ्यातील वाढत्या कोविडच्या परिस्थितीसंदर्भात साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालायात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना व आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातच कोविडची परिस्थिती गंभीर आहे. कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलची मान्यता दिली होती. परंतु तेथे योग्य इमारत नाही, सोयी-सुविधा नाहीत, आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा आहे. तेथे काम करणाऱ्या नर्सेसना करोना प्रार्दुभाव झाल्यामुळे हॉस्पिटलची कोविडची मान्यता रद्द करण्याची नामुष्की आली. ही जर सत्ताधारी नेत्यांच्या गावची परिस्थिती असेल तर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे काय, असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

वाचा:

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जो महाराष्ट्रात दिसून येत आहे तोच या जिल्ह्यातही दिसून येत आहे. लॉकडाऊन सारखा निर्णय हा येथील पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधी आदींना विश्वासात घेऊन घ्यायाला हवा होता. मनात केवळ लहर आली म्हणून लॉकडाऊन करणे योग्य नव्हे, अशी टीका दरेकर यांनी केली. सातारामध्ये कोविडची परिस्थिती गंभीर आहे. येथे सुमारे ४० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. राज्य सरकार एका बाजूला कोविडसाठी सुसज्ज खाटांची इमारती, खासगी रुग्णालये, क्वारांटाइन सेंटर उभे करत असले तरी साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात मुख्य फिजीशिअनच नाही. १० ते १२ डॉक्टर व ५० टक्के नर्सेसची कमतरता असून येथील वैदयकीय पदे तात्काळ भरण्याची आमची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातही केवळ ६ व्हेंटिलेटर्स असून ही संख्या अपुरी आहे. सातारामध्ये संकटाची स्थिती असून जिल्हाधिकाऱ्यांनी आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

सारख्या मोठ्या जिल्ह्यात स्वॅब टेस्टची व्यवस्था नाही. चाचणीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात, हे दुदैवी आहे. अजूनही येथील कोविड चाचणी सेंटर मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी साठी साधारण एक कोटीची निधी लागतो. त्यामुळे हे सेंटर उभारणे गरजेचे आहे, पण यामधूनच सरकारची अनास्था दिसून येते अशी टीकाही दरेकर यांनी केला. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी भागवत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र इंगळे, विजय काटवडे आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here