Jalna to Varanasi Special Train: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यासाठी दिवाळी भेट (Diwali Gift) देत जालना ते वाराणसी (छपरा) विशेष रेल्वे सुरू करत, बुधवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. आजपर्यंत, जालना येथून वाराणसी किंवा छपरा थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नव्हती. प्रयागराज, वाराणसी आणि त्या पलीकडे रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दोन किंवा अधिक गाड्या बदलून त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे लागत होते. या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, मराठवाडा विभागातील जालना स्थानक ते छपरा मार्गे वाराणसी आणि परत जाण्यासाठी अत्याधुनिक एलएचबी कोच असलेली साप्ताहिक विशेष ट्रेन सुरुवातीला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 6 फेऱ्या करिता सुरू करण्यात येत असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून या रेल्वेची मागणी केली जात होती. दरम्यान आता मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण करून मराठवाडा आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार इ. विविध राज्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागाने या रेल्वेला सुरवात केली आहे. त्यामुळे आता जालना छपरा-जालना (मार्गे खांडवा, वाराणसी) दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन सुरू करण्यात आली असून, बुधवारी दानवे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. 

मराठवाडा रेल्वे विकासाच्या सर्वोत्तम उपक्रमांचा साक्षीदार

यावेळी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, अलीकडच्या काळात मराठवाडा रेल्वे विकासाच्या सर्वोत्तम उपक्रमांचा साक्षीदार बनला आहे. रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, इतर मार्गांचे दुहेरीकरण सर्वेक्षण, इत्यादी पायाभूत सुविधांची विकास कामे विविध रेल्वे स्थानकावर सर्वोत्तम प्रवासी सुविधांच्या तरतुदीसह एकत्रितपणे करण्यात येत आहेत. त्याच बरोबर, या प्रदेशातील रेल्वे प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनेक पावले सातत्याने उचलली जात आहेत, जेणेकरून त्यांना त्यांच्या पसंतीच्या स्थळांवर येथून सरळ कनेक्टिव्हिटी मिळेल. जालना-छपरा-जालना येथून साप्ताहिक विशेष ट्रेन सुरू करणे हा असाच आणखी एक उपक्रम आहे. जो प्रयागराज, वाराणसी आणि छपरा यांसह इतर महत्वाच्या रेल्वे स्थानकांना लांब पल्ल्याची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी या भागातील रेल्वे प्रवाशांची गरज पूर्ण करतो, असे दानवे म्हणाले.

असा होणार फायदा….

  • प्रयागराज वाराणसी, छपरा इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या यात्रेकरू प्रवाशांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान होणार.
  • रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षित, जलद, किफायतशीर आणि आरामदायी वाहतूक प्रदान होणार.
  • मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण होणार.
  • यात सर्व प्रकारच्या प्रवाशांकरिता योग्य आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही मिळणार.
  • या रेल्वेत एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही वर्गांचा समावेश आहे.
  • रात्री उशिरा जालन्यापासून सुरू होते जेणेकरून इच्छित स्थळी सोयीस्करपणे आणि आरामात पोहोचता येईल.
  • LHB डब्यांसह चालवल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये वाढीव सुखद प्रवासाचा अनुभवासह अधिक आराम मिळणार.
  • ट्रेनच्या रचनेमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल क्लासेसचा समावेश आहे.

Maharashtra Jalna News : मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब अन् शिवसेना फुसका फटका; रावसाहेब दानवेंची ‘फटकेबाजी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here