Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Oct 2022, 10:01 am

Accident News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील हंडिया टोल गेटजवळ एका तवेरा कार विजेच्या खांबाला धडकली असून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ महिलांसह १ चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार कानपूरहून वाराणसीला जात होती.

 

Accident News
भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, भीषण अपघातात एका चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. हंडिया टोल गेटजवळ एक तवेरा कार विजेच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात ४ महिलांसह एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य ५ जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही तवेरा कार कानपूरहून वाराणसीला जात होती. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी ६.४० वाजता एक तवेरा कार (UP 78 BQ 3601) विजेच्या खांबाला धडकली. कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पाटील vs पाटील, शिंदे गटात आणखी एक झुंज, निमित्त राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या पोराचं
या अपघातात तवेरामध्ये प्रवास करणारे अन्य ५ जण देखील जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

माझ्या संपर्कात सरकारमधील नाराज सात ते आठ आमदार आहेत; बच्चू कडूंचा दावा

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here