गुड न्यूज! जालन्याहून वाराणसीला जाणे झाले सोपे, विशेष ट्रेन सुरू; पाहा कसे आहे वेळापत्रक… – jalna to chhapra train time table raosaheb danve flag off new train
जालना : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राला दिवाळीची भेट दिली आहे. दानवे यांनी जालना ते छपरा या विशेष रेल्वेचा शुभारंभ केला आहे. दानवे यांनी बुधवारी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे खासकरून मराठवाड्यातील नागरिकांना थेट वाराणसी किंवा प्रयागराजला जाता येणार आहे. जालना ते वाराणसी (छपरा मार्गे ) ही साप्ताहिक विशेष ट्रेन आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या ट्रेनच्या सुरुवातीला ६ फेऱ्या होतील. या ट्रेनला अत्याधुनिक एलएचबी डबे असतील, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
अलिकडच्या काळात मराठवाड्यात रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरणासह पायाभूत सुविधांची विकास कामे करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सुविधांसाठी अनेक कामे केली गेली आहेत. रेल्वे प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जालना-छपरा ही विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छुक ठिकाणी जाता येईल. वारणासी, प्रयागराजसह थेट उत्तर भारताशी जोडला जाईल, असे दानवे यांनी सांगितले. मराठवाड्याला काय होईल फायदा?
मराठवाड्यातील नागरिकांना देवदर्शनासाठी थेट वाराणसी, प्रयागराजला जाता येईल. तिथून पुढच्या तिर्थ स्ठळांना भेटी देणेही त्यांना सोयीचे होईल. तसेच प्रवास आरामदायी आणि जलद आणि सुरक्षित असेल. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर मध्य प्रदेश, बिहारमध्येही नागरिकांना जाता येईल. या रेल्वेच्या माध्यमातून आरक्षित आणि अनारक्षित असे दोन्ही रित्या प्रवास करता येईल. ट्रेनचे डबे अत्याधुनिक एलबीएच प्रकाराचे असतील. एसी आणि नॉन एसीचीही सुविधा आहे. फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल असे क्लासचे डबे असतील.