लखनऊ: (Sachin Pilot) यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा काँग्रेस पासून दूर जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद णि राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून देखील हटवले आहे. यानंतर सचिन पायलट यांनी देखील काँग्रेस पक्षावर पलटवार केला आहे. या परिस्थितीमध्ये प्रयागराजच्या खासदार आणि उत्तर प्रदेशातील माजी मंत्री ()यांनी सचिन पायलट यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. ( offered to join )

रीता बहुगुणा जोशी यांनी ट्विट करत सचिन पायलट यांना ही ऑफर दिली आहे. त्या म्हणतात, ‘आणखी एका काँग्रेस नेत्याचा अपमान झाला आहे. राष्ट्रहीत लक्षात घेऊन सचिन पायलट यांनी तत्काळ भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वाईट दृष्टीकोनाचे आणखी एक उदाहरण.’ रीता बहुगुणा जोशी यांच्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasad)यांनी देखील सचिन पायलट यांनी ट्विटरवरील आपले प्रोफाइल बदलल्यानंतर खेद व्यक्त केला होता.

‘सचिन सहकारीच नाहीत, मित्र देखील आहेत’

सचिन पायलट हे केवळ माझे सहकारी नाहीत, तर ते मित्र देखील आहेत, असे जितिन प्रसाद यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यांनी इतकी वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केले हे कुणीही नाकारू शकणार नाही. ही परिस्थिती अजूनही ठीक होऊ शकते असा पूर्ण विश्वास आहे. मात्र, परिस्थिती येथपर्यंत आली याचे दु:ख वाटते, अशा भावना जितिन प्रसाद यांनी व्यक्त केल्या आहेत.

पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले

बंडखोरी केल्यानंतर सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली. त्यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

वाचा:

पुढील रणनीती काय असेल हे पायलट लवकरच सांगणार

सत्याचा छळ केला जाऊ शकतो, पण सत्य पराभूत केले जाऊ शकत नाही, असे सचिन पायलट यांनी ट्विट केले होते. शिवाय त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरी माहितीतून काँग्रेसचा उल्लेख हटवला. सचिन पायलट आज बुधवारी आपली बाजू मांडणार होते. मात्र बुधवारची नियोजित पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. आपल्या रणनीतीचा ते केव्हा खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here