पॉलिसी बाजार शेअरमध्ये मोठी घसरण
पॉलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेकचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्च किमतींवरून ७४ टक्क्यांनी घसरले आहेत. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पॉलिसी बाजार समभागाने रु. १,४७० चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी बीएसईवर कंपनीचा शेअर ३८६ रुपयांवर व्यवहार करत होता. पीबी फिनटेकचे शेअर्स या कालावधीत रु. १,०८४ किंवा ७३.७४ टक्क्यांनी घसरले.पॉलिसी बाजार समभाग १,१५० रुपयांच्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत आतापर्यंत ६६.४३ टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी या समभागाने ९८० रुपयांच्या आयपीओ इश्यू प्राईसच्या १७ टक्के प्रीमियमने बाजारात पदार्पण केले. अशा परिस्थितीत जर आपण वार्षिक आधारावर पाहिले तर शेअर्स ६७.९८ टक्क्यांनी घसरले आहेत.
जोरदार प्रवेशानंतर झोमॅटोचे शेअर्स तुटले
शेअर बाजारात झोमॅटोची एन्ट्री हा धमाकाच होता. पण काही महिन्यांच्या लिस्टनंतर त्याच्या समभागांनी इतकी मोठी डुबकी घेतली की गुंतवणूकदार अद्याप सावरले नाहीत. झोमॅटोचे शेअर्स गेल्या एका वर्षात ५२.१५ टक्क्यांनी घसरले आहेत. पण गेल्या एका महिन्यात समभागांमध्ये रिकव्हरी झाली आहे आणि झोमॅटोचे शेअर्स ९.६० टक्क्यांपर्यंत चढले आहेत.
झोमॅटोचा आयपीओ १४ ते १६ जुलै २०२२ या कालावधीत उघडण्यात आला. आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि ३८.२५ पेक्षा जास्त पट सब्स्क्रिप्शन मिळाले. झोमॅटो आयपीओची किंमत ७२ ते ७६ रुपये होती तर त्याची BSE वर लिस्टिंग १२५.८० च्या इश्यू किंमतीपेक्षा ६५.५९ टक्के जास्त राहिली. लिस्टिंगनंतर झोमॅटोचे शेअर्स १६ नोव्हेंबर २०२१ रोजी BSE वर १६९.१० रुपयांवर पोहोचले होते, जे त्याची ५२ आठवड्यांची उच्च किंमत आहे. पण २७ जुलै २०२२ रोजी शेअरने ४०.५५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली होती.
पेटीएम (Paytm) गुंतवणूकदारांचे नुकसान
पेटीएमचा आयपीओ ८ ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान उघडण्यात आला. कंपनीने त्याची किंमत २०८० ते २१५० रुपयांदरम्यान ठेवली होती, पण त्याची लिस्टिंग इश्यू किमतीपेक्षा कमी दरात झाली. लिस्टिंगच्या दिवशी शेअर बीएसईवर उघडला आणि ९ टक्क्यांनी तुटला आणि संध्याकाळपर्यंत तो २७ टक्क्यांनी घसरला आणि १,५६४ रुपयांवर बंद झाला.
पेटीएमचे शेअर्स गेल्या वर्षभरात ५७.९१ टक्क्यांनी घसरले आहेत. मंगळवारी पेटीएमचा शेअर ३.०४ टक्क्यांनी वाढून ६५६.९० रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सध्या सुमारे १,४९४ रुपये प्रति शेअर तोटा आहे.
एलआयसीचा शेअरही (LIC Share) घसरला
एलआयसीचा IPO यंदा ४ ते ९ मे दरम्यान उघडण्यात आला. त्याची किंमत ९०२-९४९ रुपये ठरवण्यात अली पण शेअर बाजारात त्याची लिस्टिंग ८७२ रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा ८.११ टक्क्यांनी कमी झाली. मे महिन्याच्या उत्तरार्धात तो वाढला असला तरी, तरीही त्याची इश्यूची किंमत कमी आहे.
लिस्टिंगपासून एलआयसीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात सुमारे ३१.८८ टक्क्यांनी घट झाली आहे. लिस्टिंगच्या वेळी एलआयसीचे बाजार भांडवल रु. ६,००,२४२ कोटी होता, जे आता ३.७७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. मंगळवारीही त्याचे शेअर्स ०.६० टक्क्यांनी घसरून ५९६.२० रुपयांवर बंद झाले.
नायकाच्या (Nykaa) शेअरमध्ये मोठी घसरण
फॅशन आणि कॉस्मेटिक्स ऑनलाइन रिटेलर Nykaa ची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचा आयपीओ मोठ्या जोरात-शोरात लॉन्च करण्यात आला. कंपनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सूचीबद्ध झाली आणि त्याची इश्यू किंमत १,१२५ रुपये होती. मंगळवारी त्याचा शेअर सुमारे तीन टक्क्यांनी घसरला. तसेच गेल्या एका महिन्यात कंपनीचे समभाग १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.