ठाणे (डोंबिवली) : बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात डोंबिवलीची शहर शाखा नेमकी कोणाची यावरुन अंदाजे दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र, आज गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळला असून ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून करण्यात आला आहे आणि शिंदे गटातील नेत्यांनी या शाखेचा ताबा घेतला. दरम्यान शिवसेनेच्या शहर शाखेचे अधिकृत रजिस्टेशन झाले असून वर्धमान इंटरप्रायजेस आणि शिंदे गटातील समर्थक जितेन पाटील यांच्यात रजिस्टेशन झाल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. १४ ऑक्टोबर रोजी हे रजिस्टेशन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विशेष म्हणजे करोना काळात आधीपासूनच या शाखेच्या जागेची विक्री करायचे काम सुरु होते असं सांगत आता हे काम पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेने ही शाखा अखेर ताब्यात घेतली आहे, असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे गटातील माजी नगरसेवक, दीपेश म्हात्रे, महेश पाटील, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. तर उद्धव ठाकरे गटातील महिला पदाधिकारी शिल्पा मोरे यांनी शाखेसमोर आरडाओरडी केली.

अशी चूक करू नका! भावानं टिफिनमध्ये बॉम्ब फोडला; बहिण रक्तबंबाळ, रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू
साधारण दोन महिन्यांपूर्वी याच शाखेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटो उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी काढला होता आणि त्यावरूनच वादाची ठिणगी पेटली होती. मात्र, आज शिंदे गटातील शिवसैनिकांनी ताबा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो मध्यवर्ती शाखेवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे या फोटोची चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान, अजूनही पोलीस आणि शिवसैनिक शाखेवर आहेत.

आपल्या बायकोला जो माणूस साडीही देऊ शकत नाही तो मर्द कसला? | एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here