भोपाळ: मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये पाणीपुरी विक्रीवर तीन दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एकाच वेळी कित्येक जण आजारी पडले. त्यांना विषबाधा झाल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला. पाणीपुरी खाल्ल्यानं शहराच्या विविध भागातील जवळपास ८४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ८४ जणांपैकी ३१ मुलं एकाच सोसायटीतील आहेत.

पाणीपुरी विकायला आलेल्या एका व्यक्तीकडून सगळ्यांनी रांग लावली. मिटक्या मारत पाणीपुरीवर ताव मारला. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर मंडलाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पाणीपुरी विक्रीवर बंदी घातली. याशिवाय चाट विक्रीवरदेखील बंदी आणली.
अशी चूक करू नका! भावानं टिफिनमध्ये बॉम्ब फोडला; बहिण रक्तबंबाळ, रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू
मंडला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहर भागातील ८४ जण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या सगळ्यांनी त्यांच्या परिसरात आलेल्या एकाच व्यक्तीकडे पाणीपुरी खाल्ली होती. रुग्णांमध्ये ५७ मुलांचा समावेश आहे. इतर महिला आणि पुरुष आहेत. दोन महिला गर्भवती आहेत. या सगळ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाणीपुरी विक्रेत्याविरोधात मंडवा आणि टिकरीया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाणीपुरीवाला अनेक वर्षांपासून आमच्या परिसरात येतो. मात्र इतक्या वर्षांत कधीच कोणाला काही झालं नाही. पण आता ज्यांनी ज्यांनी पाणीपुरी खाल्ली, ते सगळेच जण आजारी पडले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं अशोक बैरागी म्हणाले. बैरागी यांच्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला उलटी आणि अतिसाराचा त्रास सुरू आहे.
देशी घेऊन घरी पोहोचला; ‘बसणार’ तितक्यात सील पॅक बाटलीत बेडूक दिसला; मग पुढे काय?
विषबाधेची प्रकरणं समोर येताच पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनानं तपास सुरू केला. जालौनची रहिवासी असलेली ७-८ कुटुंबं गेल्या १५-२० वर्षांपासून मंडलामध्ये राहत आहेत. मंडलाच्या विविध भागांत हे लोक खाण्यापिण्याचं सामान विकतात. अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपास केला. त्यांच्या घरात सिट्रिक ऍसिडचे रॅपर मिळाले. यानंतर प्रशासनानं सिट्रिक ऍसिड जिथून खरेदी करण्यात आली होती, ती सर्व दुकानं सील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here