मैनपुरी: उत्तर प्रदेशच्या मैनपुरी भाऊबीजेच्या दिवशी एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरात तयार करण्यात आलेला चहा प्यायल्यानं दोन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू झाला. विषारी चहा प्यायल्यानं एकाची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळताच औंछा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नगला कन्हई येथील एका घरात तयार करण्यात आलेला चहा चौघांच्या जीवावर बेतला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारांसाठी सैफईला हलवण्यात आलं आहे. नगला कन्हई येथील शिवनंदन यांच्या घरात गुरुवारी सकाळी भाऊबीजेची तयारी सुरू होती. फिरोजाबादला राहणारे सासरे रविंद्र सिंह त्यांच्या घरी आले होते.
एका पाणीपुरीवाल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ; आता अख्ख्या शहरात पाणीपुरी बॅन; नेमकं काय घडलं?
सगळे जण एकत्र चहा प्यायले बसले. चहा प्यायल्यानंतर रविंद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध होऊन पडले. कुटुंबीय त्यांना सावरणार इतक्यात शिवनंदन यांचा ६ वर्षांचा मुलगा शिवांग आणि ५ वर्षांचा मुलगा दिव्यांश यांचीही तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रविंद्र सिंह, शिवांग आणि दिव्यांशला रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर शिवनंदन आणि सोबरन सिंह यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना सैफईला हलवण्यात आलं. उपचारादरम्यान सोबरन यांचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. चहा पावडरच्या जागी कीटकनाशक टाकल्यानं हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अशी चूक करू नका! भावानं टिफिनमध्ये बॉम्ब फोडला; बहिण रक्तबंबाळ, रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू
चहा प्यायल्यानंतर घरातील सगळ्यांची तब्येत बिघडली. चहा तयार करताना महिलेनं चहा पावडरऐवजी कीटकनाशक टाकल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी विषारी चहा आणि त्या चहात टाकलेले सर्व पदार्थ जप्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here