भारतीय बोर्डाने टीम इंडियामधील लैंगिक असमानता संपवली आणि दोन्ही संघातील मॅच फी समान करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला. याचा अर्थ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघातील खेळाडू आणि महिला संघातील खेळाडूंना तिनही फॉर्मेटमध्ये समान मॅच फी मिळणार आहे. बोर्डाचे सचिव जय शहा यांनी ट्विटकरून ही माहिती दिली.
वाचा-
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट केले आणि सांगितले की, मला ही घोषणा करताना खुप आनंद होत आहे की बीसीसीआयने लैंगिक असमानता दुर करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. आम्ही बोर्डाशी करार केलेल्या महिला क्रिकेटपटूंना समान मॅच फी धोरण लागू करत आहोत.
भारतीय क्रिकेटमध्ये लैंगिक समानतेच्या नव्या युगात आम्ही महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देणार आहोत. नव्या व्यवस्थेनुसार आता महिला क्रिकेटपटूंना कसोटीसाटी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-२० साठी ३ लाख रुपये मॅच फी देणार आहे.
वाचा-
महिला क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्यासाठी मी वचनबद्ध होतो. यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आधी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सर्वात आधी असा निर्णय घेतला होता. क्रिकेट विश्वाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मिताली राजची प्रतिक्रिया
हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महिला क्रिकेटसाठी ही एक नवी पहाट आहे. समान मॅच फी आणि महिला आयपीएल या दोन गोष्टींमुळे महिला क्रिकेट अशा ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल येथे सध्या पुरुष क्रिकेट आहे, अशी प्रतिक्रिया भारताची दिग्गज कर्णधार मिताली राजने दिली आहे.
वाचा-
महिला क्रिकेटचा एक भाग असल्याने मी बीसीसीआय आणि सचिव जय शहा यांचे आभार मानते. आपण २०१७ पासून महिला क्रिकेटची लोकप्रियता आणि विकास पाहत आहोत. हा एक योग्य निर्णय आहे, असे ती म्हणाली.
माजी क्रिकेटपटू शांता रंगास्वामी म्हणाल्या, हा एक क्रांतिकारी निर्णय आहे. यामुळे महिलांना बरोबरीने पाहिले जाईल. कोणताही मदतभेद होणार नाही. मी जय शहा, रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांचे आभार मानते. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.