म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: जिल्ह्यात दुपारच्या टप्प्यात १२४ नवे बाधित आढळून आले. यामध्ये शहर परिसरातील ६९, तर ग्रामीण भागात ५५ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ९२२८ झाली आहे. पैकी ५३३५ बाधित हे करोनामुक्त झाले, तर ३५०५ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे. त्याचवेळी बुधवारी दुपारपर्यंत आणखी चार बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ३६८ झाली आहे.

महापालिका हद्दीत ६९ बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये अयोध्या नगर येथील १, छावणी १, एकता कॉलनी १, गजानन कॉलनी १, रोजा बाग १, जवाहर नगर १, जुने मुकुंद नगर १, पैठण रोड १, शिवाजीनगर १, श्रेयनगर १, ठाकरे नगर १, एन-दोन सिडको १, भीम नगर १, नंदनवन कॉलनी १, शेंद्रा एमआयडीसी १, उत्तरा नगरी १, घाटी परिसर १, एसटी कॉलनी ३, अशोक नगर, हर्सूल १, जाधववाडी १, जयभवानी नगर १, रमा नगर ४, दत्त नगर १, नक्षत्रवाडी ३, नगर नाका ५, मिसारवाडी १३, चेलिपुरा २, मिलिंद नगर ११, पद्मपुरा १ व इतर ठिकाणच्या ६ रहिवाशांचा समावेश आहे.

वाचाः

ग्रामीण भागात ५५ बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये जिकठाण येथील १, बोरगाव, सिल्लोड १, देवगाव रंगारी, कन्नड १, मालपाणी रेसिडन्सी १, रेणुका नगर, शिवाजीनगर १, अयोध्या नगर १, बजाज नगर ५, आनंद जनसागर, बजाज नगर १, छत्रपती नगर, बजाज नगर ३, गंगोत्री पार्क १, स्वस्तिक नगर, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी ५, लोकमान्य चौक, बजाज नगर १, ओमसाई नगर, रांजणगाव १, प्रताप चौक, बजाज नगर १, राम मंदिर परिसर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, सरस्वती सोसायटी १, राधाकृष्ण सोसायटी १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, साई प्रतिज्ञा अपार्टमेंट ३, पळसवाडी, खुलताबाद ७, बोरगाववाडी, सिल्लोड २, गणेश कॉलनी, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, म्हसोबा नगर, सिल्लोड १, पळशी, सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड १, शिक्षक कॉलनी २, टिळक नगर, तर सिल्लोड येथील एकाचा समावेश आहे.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

चिकलठाणा येथील ४५ वर्षीय, घाटी शासकीय निवासस्थानातील ७० वर्षीय व हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय तीन करोनाबाधित पुरुष रुग्णांचा घाटीत मृत्यू झाला. तसेच खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगर येथील ५९ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ३६८ झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here