t20 world cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँडवर सफाईदार विजय मिळवला. पाकिस्तानला रोमहर्षक लढतीत पराभूत करत भारतानं मिशन वर्ल्डकपची विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवर सहज विजय मिळवत भारतानं गटात पहिलं स्थान पटकावलं. सिडनीतील स्टेडियमवर भारत वि. नेदरलँड सामना रंगला. या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकानं त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं.

 

ind vs ned
सिडनी: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं नेदरलँडवर सफाईदार विजय मिळवला. पाकिस्तानला रोमहर्षक लढतीत पराभूत करत भारतानं मिशन वर्ल्डकपची विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवर सहज विजय मिळवत भारतानं गटात पहिलं स्थान पटकावलं. सिडनीतील स्टेडियमवर भारत वि. नेदरलँड सामना रंगला. या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकानं त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. गुडघ्यावर बसून तरुणानं प्रेयसीला लग्नासाठी विचारणा केली. तिनंही लगेच होकारार्थी उत्तर दिलं. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सामन्यादरम्यान प्रियकरानं केलेल्या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तरुण त्याच्या प्रेयसीसमोर उभा राहताना दिसतो. गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. ती होकार देते. यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. त्यांच्या आसपास असलेले प्रेक्षक टाळ्या वाजवून दोघांचं अभिनंदन करतात. त्यांच्या आनंदात सहभागी होतात.


जोडप्याचा व्हिडीओ आयसीसीनंदेखील शेअर केला आहे. त्यात तरुण प्रेयसीला माझ्याशी लग्न करशील का, अशी विचारणा करतो. ती लगेचच होकारार्थी उत्तर देते. दोघेही एकमेकांना आलिंगन देतात आणि उपस्थित प्रेक्षक त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. दोघांचं अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. IND vs NED: मिशन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे पाऊल पडते पुढे… नेदरलँड्सवर साकारला दणदणीत विजय
नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं २० षटकांत २ बाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलँडच्या संघानं २० षटकांत ९ बाद १२३ धावा केल्या. भारतानं हा सामना ५६ धावांनी जिंकला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here