सिडनी : असं म्हणतात की रोहित शर्मासारख्या फलंदाजाची जर कॅच मिळत असेल तर ती पटकवण्यासाठी सर्वस्व अर्पण करावं. काहीही करावं पण तो झेल काही केल्या सोडू नये. रोहितची कॅच सोडल्यावर काय होतं याचा अनुभव आज नेदरलँडच्या खेळाडूंनी घेतला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा ५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेल सोडण्यात आला. फ्रेड क्लासेनच्या गोलंदाजीवर रोहितने चुकीचा फटका मारला. पण नशिबाने साथ दिली आणि प्रिंगलने त्याचा झेल सोडला.

असं केलं अर्धशतक पूर्ण
यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाला सुरुवातीच्या धक्क्यातून तर सावरलंच, पण डच गोलंदाजांनाही चांगलंच झोडपलं. रोहित शर्माने सात सामन्यांनंतर ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने ११ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याची ही संपूर्ण खेळी पाहण्यासारखी होती.

रोहितने युवराजला सोडले मागे

१२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फ्रेड क्लासेनच्या चेंडूवर एकरमैनने झेल घेतल्याने रोहितला पॅव्हेलीनमध्ये परतावे लागले. त्याने ३९ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. यादरम्यान, तो टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज झाला. त्याने युवराज सिंगचा विक्रमही मोडला. युवराज सिंगने ३३ चौकार लगावले होते. पण रोहित आता त्याच्या पुढे गेला आहे.

आजही चालला नाही केएल राहुल

नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु सलामीवीर केएल राहुल ९ धावा करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. चेंडू स्टंपच्या बाहेर जात होता, पण रोहितच्या सल्ल्याने त्याने डीआरएस न घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोहितने विराटसह डाव पुढे नेला. यापूर्वी मेलबर्नमध्ये भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here