anand mahindra tweet: उद्योगपती आनंद महिंद्रांचं एक ट्विट सध्या लक्षवेधी ठरत आहे. महिंद्रांच्या ट्विटनं अनेकांची मनं जिंकली आहेत. महिंद्रा यांनी एका मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिनं एकाचवेळी १५ पोट्रेट पेंट केली आहेत. या मुलीची प्रतिभा पाहून महिंद्रा थक्क झाले आहेत.

हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्न महिंद्रा यांना नूरची कला पाहून पडला आहे. ‘ही मुलगी प्रतिभासंपन्न कलाकार आहे. एकाचवेळी १५ पोट्रेट साकारणं कलेपेक्षा खूप जास्त आहे. हा एक चमत्कार आहे. कोणी तिच्या आसपास राहणारं तिच्या या कमाल कामगिरीची पुष्टी देऊ शकेल का? या मुलीनं खरोखरच ही चित्रं साकारली असतील तर तिला प्रोत्साहन द्यायला हवं. तिला एखादी शिष्यवृत्ती किंवा अन्य एखाद्या स्वरुपाची मदत करता आल्यास मला आनंद होईल,’ असं महिंद्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांचं ट्विट ५८ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. ११ हजारांपेक्षा जास्त जणांनी महिंद्रांचं ट्विट रिट्विट केलं आहे. मुलीचा व्हिडीओ आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. महिंद्रांच्या ट्विटवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.