madhya pradesh news: मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका मंदिरात चोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोर लक्झरी कारमधून चोरी करण्यासाठी पोहोचला. चेहरा झाकून घेत त्यानं मंदिरातील दानपेटी लंपास केली. जबलपूरच्या गौर चौकी येथील सालीवाडा हनुमान मंदिरात हा प्रकार घडला

शनिवारी रात्री २ च्या सुमारास हनुमान मंदिरात चोरी झाली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. परिसरात वास्तव्यास असलेले अजय दुबे पूजा करण्यासाठी मंदिरात पोहोचले. त्यावेळी त्यांना दानपेटी दिसली नाही. त्यांची याची माहिती ग्रामस्थांना दिली. सीसीटीव्हीत चोरी कैद झाली आहे. त्यात एक चोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरताना दिसत आहे. त्यानं तोंड झाकलं आहे. त्याच्या उजव्या हातात दोन अंगठ्या आणि डाव्या हातात घड्याळ दिसत आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.