येथे मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून पालकमंत्री यांनी आज कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली. त्यानंतर पुलाच्या बांधकामाची भिंत कोसळणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत या प्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ( )
वाचा:
प्रशस्त होत असतानाच कणकवलीतील दुर्घटनेचे गालबोट त्याला लागले आहे. त्याअनुशंगाने महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाच्या कामाची पूर्ण चौकशी करण्यासाठी पोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करावा. जो पर्यंत महामार्गाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, ठेकेदाराने नियमानुसार काम केले आहे किंवा कसे याचा संपूर्ण अहवाल प्राप्त होत नाही, तो पर्यंत त्यांचे एकही बिल मंजूर करू नये. कामातील बेजबाबदारपणाबद्दल ठेकेदारासह सर्व जबाबदार यंत्रणा व व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी यासाठी पाठपुरावा करावा.
वाचा:
कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय असावे. या ठिकाणी ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी यांचे जबाबदार अधिकारी कायम उपस्थित असावेत. सध्या पडलेल्या भिंतीची तात्पुरती दुरुस्ती सुरू करावी. पावसाळ्यानंतर ती भिंत पूर्ण काढण्यात यावी. ज्याठिकाणी सध्या भराव आहे त्या ठिकाणी पिलरचा पुल उभारण्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने केंद्राकडे सादर करावा. महामार्गावरील पाण्याचा निचरा योग्यरितीने व्हावा यासाठी तातडीने कार्यवाही करून काम सुरू करावीत. महामार्गावर एखादा अपघात झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या संदर्भात दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. बैठकीला आमदार , जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलिम शेख, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.
वाचा:
बैठकीपूर्वी सामंत यांनी स्वतः सर्व अधिकारी यांच्या समवेत कणकवली येथे महामार्ग पुलाची भिंत पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्ग व स्थानिकांकडून सर्व समस्या जाणून घेतल्या.
चाकरमान्यांची वाट सुकर होणार
सार्वजनिक गणेशोत्सव व घरगुती गणेशोत्सव यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. चाकरमान्यांना सुलभपणे गावी कसे येता येईल या विचार सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times