राज्यात आतापर्यंत १७, ३९० जण करोनामुक्त झाले आहेत. यापैकी ४९९२चे आहेत. कर्नाटकचे कोविड मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना करण्याचे आवाहन केले आहे. प्लाझ्मा दात्यांना ५ हजार रुपये प्रत्सोहन निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं सुधाकर यांनी सांगितलं. यामुळे करोनामुक्त झालेल्यांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दानासाठी पुढे यावं आणि करोना रुग्णांना नवजीवन द्यावं, असं सुधाकर म्हणाले.
प्लाझ्मा थेरपी करोना रुग्णांसाठी दिलासादायक
प्लाझ्मा थेरपीने कर्नाटकमध्ये पाच रुग्णांवर उपचार केले गेले. यापैकी तीन रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. तर इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. प्लाझ्मा थेरपी करोना रुग्णांसाठी अधिक दिलासादायक ठरत आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. यामुळेच सरकारने करोनामुक्त झालेल्यांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान केल्यास त्यांना ५००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असं डॉ. के. सुधाकर यांनी सांगितलं.
दरम्यान, कर्नाटकात आज करोनाचे ३१७६ नवीन रुग्ण आढळले. यापैकी १९७५ रुग्ण हे बेंगळुरूतील. तर ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७, २५३ पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण ९२८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times