पिंपरी चिंचवड : सोशल मीडियाचा कोण कसा उपयोग करेल याचा काही नेम नाही. इंस्टाग्रामवर चक्क पिस्तूल विक्रीचे स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. मध्य प्रदेशमधून ही ६ पिस्तूलं आणल्याचं समोर आले आहे. पोलिसांच्या गुंडविरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ३ पिस्तुल आणि बारा काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिकी अशी की, खंडू आणि अक्षय या दोघांनी मध्य प्रदेश येथून सहा पिस्तुलं आणली. यापैकी तीन पिस्तुलं घेऊन सराईत गुन्हेगार तुषार उर्फ आप्पा गोगावले हा पसार झाला आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

गुड न्यूज! मुंबईतील या दोन मार्गांवरील मेट्रोची विस्तारीत वाहतूक डिसेंबरमध्ये होणार सुरू
पोलिसांना पिस्तुल विक्री करणारे पिंपरी येथील डांगे चौकात येणार होते. तसेच खंडू याने इंस्टाग्रामला पिस्तुल विक्रीच स्टेट्स ठेवलं होतं. त्यात त्याने ७० हजार रुपयांना पिस्तुल आणि काडतुसे विकणार असल्याचेही म्हंटले होते. याबाबत पोलिसांनी डांगे चौक इथे पोलिसांनी सापळा रचून विक्रीसाठी आलेल्यांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर असे स्टेटस ठेवल्यास पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

थंडीची एन्ट्री… राज्यात वाढतोय आल्हाददायी गारठा!; मुंबईत मात्र सर्वाधिक कमाल तापमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here