म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शहरातील खोटनगरातील रहीवासी असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती आहे. संदीप धर्मराज निरखे (३५,मुळ रा.आव्हाणे, ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

वाचाः

मृत संदीप हा फेब्रीकेशनचे काम करीत होता. खोटे नगर परिसरातील पंडीत क्वॉर्नर या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर तो कुटुंबासह राहत होता. मंगळवारी दुपारपासून तो तणावात होता. रात्री अकरा वाजता घरातील गॅलरीत गेला. तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या मुलीने त्याला पाहिले व रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला अपयश आले. गॅलरीतून खाली उडी घेतली.

वाचाः

डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव व गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. संदीप याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. संदीप हा मुळचा आव्हाणे, ता.जळगाव येथील रहिवाशी असून पाच वर्षापासून तो शहरात रहायला आला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here