मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे. शेअर बाजार आज काही मिनिटांच्या घसरणीसह उघडल्यानंतर हिरव्या चिन्हावर आला. एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १९.४५ अंकांच्या किंवा ०.११ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह १७,७५६.४० वर उघडला. त्याच वेळी, बीएसईचा शेअर निर्देशांक सेन्सेक्स २०० अंकांच्या किंवा ०.०१७ टक्क्यांची उसळी घेत ५९,७४६.८० वर उघडला.

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक! महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा
प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची वाटचाल
आज बाजाराच्या सुरुवातीपूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये संमिश्र व्यवसाय दिसून आला. निफ्टी हिरव्या चिन्हात तर सेन्सेक्स लाल चिन्हात दिसत होता. सेन्सेक्स १०.४५ अंकांच्या किंवा ०.०२ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह ५९,७४६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी १९.४५ अंक किंवा ०.११ टक्क्यांनी किंचित वाढला आणि १७,७५६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

या आयपीओंनी गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या
सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग हिरव्या चिन्हांसह व्यवहार करताना दिसत आहेत आणि ६ समभागांत घसरण दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या ५० पैकी ३८ समभागांमध्ये वाढ होत असून १२ समभाग घसरत आहेत. दरम्यान, आज रिलायन्सने सेन्सेक्सवर सर्वाधिक १.३३ टक्के वाढ नोंदवली. याशिवाय मारुती, एचडीएफसी, आयटीसी यांसारखे समभाग हिरव्या चिन्हावर व्यवहार करत होते.

छोटा पॅकेट बडा धमाका! १ रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल, २५०% लाभांशाची घोषणा
गुरुवारची परिस्थिती

जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांदरम्यान धातू, रिअॅल्टी आणि ऊर्जा समभागांमध्ये जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या बेंचमार्क निर्देशांकांनी गुरुवारी चांगली वाढ नोंदवली. बीएसई ३० शेअर्सचा सेन्सेक्स २१२.८८ अंकांनी किंवा ०.३६ टक्क्यांनी वाढून ५९,७५६.८४ अंकांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान एका क्षणी ४१५.९८ अंक किंवा ०.६९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८०.६० अंकांनी म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी वाढून १७,७३६.९५ वर बंद झाला. दिवाळी पाडवानिमित्त बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये टाटा स्टील सर्वात जास्त ३.०२ टक्क्यांनी वाढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here