Maharashtra Politics | महाराष्ट्रातील तीन प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील कोणत्याही नेत्याने साधा ब्र ही काढलेला नाही. मुळात महाराष्ट्रात शिंदे-फडमवीस सरकार स्थापन करण्यापाठी केंद्र सरकारचा हाच हेतू होता का? महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पळवण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणले होते का? जेणेकरून हे प्रकल्प सुरळीतपणे गुजरातमध्ये नेता येतील आणि कोणीही काही बोलणार नाही

 

Shinde Fadnavis govt
टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला

हायलाइट्स:

  • राज्यात होणारी गुंतवणूक गेली
  • सर्वात मोठी खंत ही रोजगाराच्या संधी गेल्याची आहे
  • शिंदे-फडणवीस सरकारचे एखादे तरी शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेले का?
मुंबई: राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा सवाल माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याच्या ‘टायमिंग’कडे सुभाष देसाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रातील तीन प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील कोणत्याही नेत्याने साधा ब्र ही काढलेला नाही. मुळात महाराष्ट्रात शिंदे-फडमवीस सरकार स्थापन करण्यापाठी केंद्र सरकारचा हाच हेतू होता का? महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पळवण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणले होते का? जेणेकरून हे प्रकल्प सुरळीतपणे गुजरातमध्ये नेता येतील आणि कोणीही काही बोलणार नाही, हा केंद्र सरकारचा डाव होता, असा गंभीर आरोप सुभाष देसाई यांनी केला. मी हे वक्तव्य विचारपूर्वक करत आहे. महाराष्ट्रातील तिन्ही प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे एखादे तरी शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेले का? केंद्र सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला का?, असे सवाल देसाई यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
नागपूरचा प्रकल्पही गुजरातला! ‘एअरबस-टाटा’ची रविवारी बडोद्यात पायाभरणी; वैदर्भीयांमध्ये नाराजी
या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात होणारी गुंतवणूक तर गेलीच आहे, पण सर्वात मोठी खंत ही रोजगाराच्या संधी गेल्याची आहे. आपल्याकडे दरवर्षी महाविद्यालयांमधून हजारो अभियंते उत्तीर्ण होतात, आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांना आता रोजगारासाठी इतर राज्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. आपण महाराष्ट्रातील रोजगाराची संधी एक एक करून गमावत आहोत, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.

Tata-Airbus: महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले….

तीन महिन्यांत महाराष्ट्राने तीन मोठे प्रकल्प गमावले: सुभाष देसाई

महाराष्ट्रातील आणखी किती प्रकल्प गुजरातला नेण्याच्या घोषणा शिंदे-फडणवीस सरकारच्या पोतडीत बाकी आहेत, असा सवाल सुभाष देसाई यांनी विचारला. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्राला बसलेला हा तिसरा धक्का आहे. आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, त्यानंतर रोहा-मुरूड येथे प्रस्तावित असलेला बल्क ड्रगपार्क प्रकल्प आणि आता टाटा-एअरबस, हे तिन्ही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातामधून गेले आहेत. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात चांगल्याप्रकारे बोलणी सुरु होती. या प्रकल्पात भारतीय हवाई दलाला लागणारी विमाने तयार केली जाणार होती. टाटा आणि एअरबसच्या या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात २२ हजार कोटींची गुंतवणूक आली असती, याकडे सुभाष देसाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here