पुणे: महापालिकेने प्रयोगशाळांच्या चाचण्यांसह अँटीजेन चाचणी करण्यास सुरुवात केल्याने चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. , जिल्ह्यात बुधवारी करोना संसर्गाचे १५१० नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ४२ हजाराच्या पुढे गेली आहे; तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील रुग्णसंख्या ३० हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. ७४६ जणांना शहरात रुग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज मिळाला आहे. ( )

वाचा:

शहरात बुधवारी अँटीजेन आणि प्रयोगशाळांमधून ६ हजार ३४३ चाचण्या करण्यात आल्या. शहरातील एकूण चाचण्यांची संख्या १ लाख ७८ हजार ११५ एवढी झाली आहे. ७४६ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडले असून ५०२ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गंभीर; तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या संख्येतही भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासूनही संख्या वाढत असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. ५०२ रुग्णांपैकी ७६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत; तर ४२६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गेल्या काही दिवसांत व्हेंटिलेटरवरील रुग्ण हे १९८ पर्यंत होते. त्यात अचानक घट झाली आहे. शहरात बुधवारी ७४६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत १९ हजार ५७० रुग्ण घरी परतले आहेत, यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून या रुग्णसंख्येने दहा हजारांचा आकडा ओलांडला आहे, ही धोक्याची घंटा आहे.

वाचा:

पुणे शहरासह जिल्ह्यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यात १८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १६ तसेच ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील बुधवारची स्थिती

पुणे पालिका नवीन रुग्ण – ८१८
नवीन रुग्ण – ४३३
पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण – १०५
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण – १५४
बुधवारी बरे झालेले रुग्ण – ७४६
बुधवारचे मृत्यू – ३५

एकूण पॉझिटिव्ह : ४२८३६ (पुणे शहर : २९५४४, पिंपरी-चिंचवड : ८८५३, पुणे ग्रामीण : २५९७, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : १८४२)

वाचा:

दोन दिवसांमध्ये ४१२ जणांवर गुन्हे

काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ४१२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवानगी रस्त्यावर फिरणाऱ्या २६३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात दिवसा १०३ ठिकाणी आणि रात्री ५५ ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. दरम्यान, विना मास्क फिरणाऱ्या ५१ जणांवर आणि विनापरवाना रस्त्यावर वाहने आणणाऱ्या ७९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अशा परिस्थितीत नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here