न्यूयॉर्क: फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी वर्ष २०२२ चांगले राहिले नाही. तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ (Meta) कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. मेटाचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. मेटाचा बॉस मार्क झुकेरबर्गचा ड्रीम प्रोजेक्ट मेटाव्हर्सचा कंपनीवरचा वाढता बोजा पाहता गुंतवणूकदारांचा विश्वास कंपनीवरून उठत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणास्तव, कंपनीच्या समभागांची जोरदार विक्री झाली आहे. याशिवाय, सलग चौथ्या तिमाहीत मेटाच्या नफ्यात घसरण झाल्याने गुंतवणूकदारही चिंतेत आहेत.

Mark Zuckerberg चे ४ कोटी फेसबुक फॉलोअर्सचे झाले ९९९२, हे का घडले?, पाहा डिटेल्स
‘मेटा’ने सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत जाहिरात महसुलात लक्षणीय घट नोंदवली. व्हरायटीच्या अहवालानुसार कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी घट झाली असून कंपनीच्या महसुलात सलग दुसऱ्या तिमाहीत घट नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, मेटाचा नफा देखील वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे स्टॉकचा भाव १०० डॉलरच्या खाली घसरला आहे, जो २०२१६ नंतरची त्यांची सर्वात कमी किंमत आहे.

मार्क झुकरबर्ग यांना दणका; मेटा कंपनीला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले
निव्वळ उत्पन्न प्रचंड घसरले
तिसऱ्या तिमाहीत त्यांच्या फ्लॅगशिप फेसबुक अॅपच्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या १.९८४ अब्ज होती, जी मागील तिमाहीपेक्षा १६ दशलक्ष अधिक होती, असे कंपनीने सांगितले. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत २७.७१ अब्ज डॉलरची एकूण कमाई आणि ४.४ अब्ज डॉलरचे निव्वळ उत्पन्न नोंदवले. अशाप्रकारे कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात वार्षिक ५२ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक कंपनी म्हणून ‘मेटा’च्या महसुलात वार्षिक आधारावर दुसऱ्यांदा घट नोंदवली गेली आहे. यापूर्वी दुसऱ्या तिमाहीत १ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती.

मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या कंपन्यांमध्ये ३२ हजारहून कर्मचार्‍यांच्या गेल्या नोकऱ्या
विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरले
व्हरायटीने Refinitiv कडील डेटा उद्धृत करत म्हटले की विश्लेषकांना २७.३८ अब्ज डॉलर कमाईची अपेक्षा होती. पण, त्यांचा अपेक्षा भंग झाला. मेटापूर्वी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आणि स्नॅपने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. दोन्ही कंपन्यांच्या महसुलातही घट झाली आहे. जाहिरातीवरील खर्चात झालेली कपात हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

झुकरबर्गच्या ड्रीम प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह
या तिमाहीतील कमकुवत परिणामांमुळे मेटाव्हर्सच्या वर्षाला १० अब्ज डॉलर खर्च करण्याच्या योजनेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रकल्प ‘मेटा’ला जड जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत, संकल्पनेव्यतिरिक्त याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार मेटाव्हर्सकडे संशयाने पाहू लागले आहेत. तसेच या वर्षी आतापर्यंत मेटाचा स्टॉक ६८ टक्क्यांहून अधिक तुटला आहे. महसुलात तीव्र घट व्यतिरिक्त मेटाने चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमकुवत विक्रीचा अंदाज देखील वर्तवला आहे. मेटाने चौथ्या तिमाहीत ३० अब्ज ते ३२.५ अब्ज डॉलर विक्रीचा अंदाज व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here