delhi aiims hospital news today, चमत्कारच झाला ! ७ महिन्यांपासून रुग्णालयात बेशुद्ध असलेल्या महिलेने दिला लेकीला जन्म – a miracle happened a woman who was unconscious for 7 months in delhi aiims gave birth to a baby girl
नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेने ज्या अवस्थेत बाळाला जन्म दिला आहे. पण हा क्षण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. जवळपास ७ महिन्यांपासून रुग्णालयात बेशुद्धावस्थेत पडलेल्या २३ वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. खरंतर, महिला बुलंदशहरची रहिवासी आहे. सात महिन्यांपूर्वी तिचा रस्ता अपघात झाला होता, त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून ही महिला सात महिन्यांपासून रुग्णालयात बेशुद्ध पडून आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीला जन्म देणारी महिला ३१ मार्च रोजी रस्ता अपघाताची शिकार झाली होती. ती तिच्या पतीसोबत मोटारसायकल चालवत होती आणि यावेळी महिलेने हेल्मेट घातले नव्हते. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ती वाचली तरी ती बेशुद्धच राहिली. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रोफेसर दीपक गुप्ता यांनी सांगितले की, महिला बेशुद्ध अवस्थेत आहे, तिने डोळे उघडले, परंतु तिला काहीही समजत नव्हते. अंत्यसंस्कार होणार तोच मृत तरुण चक्क झाला जिवंत, सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती ४० दिवसांची गर्भवती होती. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या टीमने तिच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचं सांगितलं. गर्भधारणा करण्यासाठी धोका होता. यानंतर डॉक्टरांनी बाळाला ठेवायचे की नाही ठेवायचे याचा निर्णय रुग्णाच्या कुटुंबावर सोडला. यानंतर महिलेच्या पतीने बाळाचा गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ आहे. बाळाला सध्या बाटलीतून दूध दिले जात आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा महिला रुग्णालयात पोहोचली तेव्हा ती बेशुद्ध होती. ३० मार्च ते १५ जून दरम्यान एकूण पाच न्यूरोसर्जिकल ऑपरेशन्स करण्यात आल्या.