वाचा:
सरकारकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणात प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता सरकारला परत करावी. तसेच गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे, त्या व्यक्तींकडून कर्जामाफीची रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
वाचा:
सांगली जिल्ह्यातील तालुक्यात गोटखिंडी येथील वित्तीय संस्थेमध्ये सातबारा नसताना कर्जवाटप करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने १२ व्यक्तींवर यापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील या योजनेचा गैरलाभ घेतल्याची शक्यता बळावली होती. बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती तलाठ्यांमार्फत उपलब्ध करून शासकीय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते. यामध्ये मिरज तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांची यादी वगळता जिल्ह्यातील कर्जखात्यांची शासकिय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले २०१९ या योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे.
वाचा:
गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या नावे शेतजमीन नसताना विना सातबारा उताऱ्याची ६० कर्जप्रकरणे, पीक कर्जाव्यतिरिक्त सामान्य कर्जे, गाय, म्हैस, शेळी खरेदीची कर्जे, इतर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाचा समावेश चुकीच्या पद्धतीने कर्जमुक्ती योजनेमध्ये केल्याची ५२ प्रकरणे, क्षेत्र नसताना बनावट सातबारा दाखल करून घेतलेली कर्जाची ७ प्रकरणे, जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचलीची ७ प्रकरणे, सातबारा आहे परंतु जादा कर्जवाटपाची ३ प्रकरणे, यापूर्वी गुन्हा दाखल असलेली १२ प्रकरणे, अशी एकूण १४१ प्रकरणे उघडकीस आली. यातील अपात्र ११० कर्ज खात्यांवर सुमारे ९२ लाख ४२ हजार ८३३ रुपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times