Maharashtra Politics | टाटा-एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत वगळता भाजप किंवा शिंदे गटाचा एकही नेता पुढे आलेला नाही. याउलट शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनीही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट भाषेत हल्ला चढवला आहे.

हायलाइट्स:
- आपल्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये काय केलं?
- आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
टाटा-एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरच्या मिहान येथे प्रस्तावित होता. मात्र, ऐनवेळी हा प्रकल्प गुजरातच्या बडोद्यात गेला. यावरुन सध्या प्रचंड मोठा राजकीय वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करून त्यांना कोंडीत पकडले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला हा चौथा प्रकल्प आहे. खोके सरकारवर कुठल्याही उद्योजकाचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आपल्या राज्यात येणारी गुंतवणूक आणि प्रकल्प दुसरीकडे चालल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
टाटा-एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत वगळता भाजप किंवा शिंदे गटाचा एकही नेता पुढे आलेला नाही. याउलट शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच केंद्राने शिंदे-फडणवीस सरकार आणलं: सुभाष देसाई
राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा सवाल माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याच्या ‘टायमिंग’कडे सुभाष देसाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.