मुंबई- ‘अवघाचि हा संसार’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष हिने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ती न्यूज ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. अमृताने एक फोटो पोस्ट करत आपण आई होणार असल्याचं म्हटलं आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. महत्वाचं म्हणजे अमृता वयाच्या ४३ व्या वर्षी आई होत आहे. त्यामुळे हे क्षण तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी नक्कीच खास आहेत. आता तिने आपला आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


अमृताने अनेक मालिका आणि चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. आता तिने बॉलिवूडमध्येही नाव कमवायला सुरुवात केली आहे. मात्र आता ती खऱ्या आयुष्यात देखील एका आईची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. तिने शेअर केलेल्या फोटोत एक प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली स्ट्रीप आणि एक बाळाचं खेळणं दिसत आहे. केवळ या दोन गोष्टी शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.


चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सोबतच आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी ‘आई शप्पथ काय सांगतेस’ अशी प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अमृताने या पोस्टमध्ये वंडर वुमन या इन्स्टाग्राम पेजला टॅग केलं आहे. त्यामुळे ही पोस्ट अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टचा हा एक भागही असू शकतो असं काहींचं म्हणणं आहे.

WhatsApp Image 2022-10-28 at 1.52.37 PM.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here