नवी दिल्ली: फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटाव्हर्स’चे शेअर्स गुरुवारी जवळपास २४ टक्क्यांनी घसरले. याशिवाय कंपनीची कमाई देखील अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तसेच, त्यांचा डिजिटल जाहिरात व्यवसाय चांगला चालत नाही, त्यामुळे आगामी काळात विक्रीतही घट होण्याची शक्यता आहे, असेही कंपनीने म्हटले. शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या निव्वळ संपत्तीतही गुरुवारी ११.२ अब्ज डॉलर्स किंवा ९२,३५५ कोटी रुपयांची घट झाली. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी ८७.८ अब्ज डॉलरने घसरली आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार अंबानींची एकूण संपत्ती ८४ डॉलर अब्ज आहे. या घसरणीसह झुकेरबर्ग जगातील श्रीमंतांच्या यादीत २३व्या क्रमांकावरून थेट २८व्या क्रमांकावर घसरले आहेत. फेसबुकच्या महसुलात सलग तिसऱ्या तिमाहीत घट नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या Metaverse लिंक्ड युनिटचेही अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. यावर्षी ९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले तर २०२१ पासून २० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. दरम्यान, चौथ्या तिमाहीतही कंपनीचा महसूल ३० ते ३२.५ अब्ज इतका अपेक्षित आहे, जो विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

झुकरबर्गच्या ड्रीम प्रोजेक्टने गुंतवणूकदारांची झोप उडाली, कमजोर निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड
गुरुवारच्या घसरणीमुळे मेटाचे बाजार मूल्य ८० डॉलर अब्जने घातले आहेत. मेटा शेअर्स एका वर्षात ६७ टक्क्यांनी घसरले तर या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅप देखी ७०० डॉलर अब्जांनी घसरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीचे मार्केट कॅप १ ट्रिलियन होतेडॉलर , जे आता २६८ बिलियन डॉलरवर आले आहे. त्यामुळे झुकेरबर्गच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाली आहे. एकेकाळी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत असलेले झुकेरबर्ग आता २८व्या क्रमांकावर घसरला आहेत. यंदा त्यांची एकूण संपत्ती सर्वात जास्त घसरली आहे. अमेरिकेतील टॉप-२० कंपन्यांच्या यादीतून मेटालाही वगळण्यात आले आहे.

Mark Zuckerberg चे ४ कोटी फेसबुक फॉलोअर्सचे झाले ९९९२, हे का घडले?, पाहा डिटेल्स
जेफ बेझोस यांची संपत्तीही घसरली
दुसरीकडे, इतर टेक स्टॉक्समध्येही गुरुवारी मोठी घसरण झाली. अॅमेझॉनचे शेअर्सही चार टक्क्यांहून अधिक घसरले, ज्यामुळे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती ४.६८ अब्ज डॉलरने घसरून १३४ अब्ज डॉलरवर आली आहे. याआधी बुधवारीही त्याच्या संपत्तीत घट झाली होती आणि श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले होते. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी ५८.४ अब्ज डॉलरने घसरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टच्या निव्वळ संपत्तीतही गुरुवारी २.९९ अब्ज डॉलरने कमी होऊन आता १४२ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. याशिवाय टेस्लाचे सीईओ एलोन मस्क २१२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

अंबानी आणि अदानींची स्थिती
दरम्यान, भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती गुरुवारी २.९५ अब्ज डॉलर्सने वाढून १२५ अब्ज डॉलरवर पोहोचली. अदानीच्या एकूण संपत्तीत यावर्षी ४८.७ अब्ज डॉलरची वाढ झाली असून यावर्षी ते सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गुरुवारी, त्यांची एकूण संपत्ती ५६७ दशलक्ष डॉलरने वाढून ८४ डॉलर अब्ज झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here