बारामती : बारामती तालुक्यातील माळेगावात सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचे पाहिला मिळाले आहे. भावानेच भावाची चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. २८ ऑक्टोबरला रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत सुरेखा अरुण धुळप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घरात ही घटना घडली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश अरुण धुळप (वय २६, रा . अमरसिन्ह कॉलनी, माळेगाव बुद्रूक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ मंथन अरुण धुळप (वय २३) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या बाळ्या सिंगरचा मृत्यू, मासेमारी करताना शॉक लागला अन्… कल्पेश व मंथन ही फिर्यादीची मुले आहेत. शुक्रवारी मंथन याने मोठा भाऊ कल्पेश याला चप्पल व्यवसायासाठी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या १ लाख ४० हजार रूपयांबद्दल विचारणा केली. त्यावर कल्पेश याने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याने आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत.
मी नंतर पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे मंथन हा त्याच्यावर रागावला. या कारणावरून कल्पेश याने त्याला हाताने, बुक्यानी मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील कपाटातील चाकू काढून कल्पेश याच्या मानेवर, छातीवर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी तात्काळ मंथन यास अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बारामती उपकारागृहात त्याला ठेवण्यात आले.