औरंगाबाद : हॉटेलमध्ये तरुणांच्या भांडणानंतर पडलेला मोबाईल हॉटेल चालकाला सापडल्यानंतर धक्कादायक घटना उघड झाली आहे. मोबाईलमधील व्हिडिओ पहिल्यानंतर हॉटेल चालकाला धक्काच बसला. कारण या व्हिडिओत एक तरुण मित्राच्या पाळीव श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पराग पावटेकर (रा.अंगुरीबाग, मोती कारंजा, औरंगाबाद) याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ७ सप्टेंबर रोजी रात्री बीड बायपास परिसरात असलेल्या ‘क्लाऊड नाईन’ या हॉटेलमध्ये काही तरुणांमध्ये जोरदार भांडण झाले होते. हाणामारी करणाऱ्या तरुणांपैकी अनिकेत आठवले या तरुणाचा मोबाईल हॉटेलमध्येच पडला होता. हॉटेलचालक प्रतिक किरीट सोनी यांना तो मोबाईल सापडला. त्यांनी या मोबाईलची गॅलरी उघडून पाहिली असता त्यात पराग हा एका पाळीव श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ त्यांना दिसला. तो श्वान परागचा मित्र यशराज रामटेके याचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो व्हिडिओ सोनी यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये घेत विसरलेला मोबाईल तरुणाला परत केला.

अल्पवयीन मुलीला पळवून नेत लग्न केलं, मग… पुण्यातील लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

दरम्यान, या घटनेची तक्रार पेट लव्हर असोसिएशनकडे करण्यात आल्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक कृत्य व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदानुसार परागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here