navi mumbai crime: नवी मुंबईतील दिघा येथील आनंद नगर रोडवर असलेल्या ताडी माडीच्या दुकानात एकाचा मारहाणीत मृत्यू झाला. राज उतेकर असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मोठ्या आवाजात बोलण्यावरून वाद झाला. त्यावरून आरोपीनं हल्ला केला. त्यात उतेकर यांचा मृत्यू झाला.

 

navi mumbai murder
नवी मुंबई: नवी मुंबईतील दिघा येथील आनंद नगर रोडवर असलेल्या ताडी माडीच्या दुकानात एकाचा मारहाणीत मृत्यू झाला. राज उतेकर असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मोठ्या आवाजात बोलण्यावरून वाद झाला. त्यावरून आरोपीनं हल्ला केला. त्यात उतेकर यांचा मृत्यू झाला.

मोठ्या आवाजात बोलण्यावरून राज उतेकर आणि आरोपी सोनू पांडे यांच्यात वाद झाला. सोनूनं राज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राज यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजू सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून आरोपी सोनू पांडे याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. २६ ऑक्टोबरला रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here