t20 world cup: पाकिस्तानच्या सुंदर क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या कायनात इम्तियाजनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिनं स्वत:च्या फोटोसह केवळ तीन शब्द पोस्ट केले आहेत. Visualise – Focus – Execute अशी तीन शब्दांची पोस्ट कायनातनं केली आहे

 

kaynat
नवी दिल्ली: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची अवस्था बिकट आहे. भारतापाठोपाठ झिम्बाब्वेनं पाकिस्तानला पाणी पाजलं. दोन्ही सामने चुरशीचे झाले. मात्र पाकिस्ताननं मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. त्यामुळे आता त्यांचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर टीकेचा भडिमार होत आहे. आता पाकिस्तानी महिला क्रिकेटरनंदेखील एक फोटो पोस्ट करत माफक शब्दांत बाबर सेनेला लक्ष्य केलं आहे.

पाकिस्तानच्या सुंदर क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या कायनात इम्तियाजनं एक ट्विट केलं आहे. तिनं स्वत:च्या फोटोसह केवळ तीन शब्द ट्विट केले आहेत. Visualise – Focus – Execute अशा तीन शब्दांचं ट्विट कायनातनं केलं आहे. त्यावरून पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी थेट बाबरच्या संघाची धुलाई सुरू केली. बाबर आझामच्या टीमला काहीतरी सांगा, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया अनेकांनी कायनातच्या पोस्टवर दिल्या आहेत. भारतात कायनातचे असंख्य चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर भारतीयांच्या कमेंट असतात.

पाकिस्तानी संघाची टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं शतकी भागिदारी रचत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. शेवटच्या तीन षटकांमध्ये ४८ धावा कुटत भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. कोहलीनं नाबाद ८२ धावा काढत गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.
फ्री हिटवर कोहली बोल्ड; तरीही ३ धावा कशा काढल्या? दिग्गज पंचानं सोप्या शब्दांत नियम सांगितला
दुसऱ्या सामन्यात लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा पराभव केला. झिम्बाब्वेनं दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानला जमला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार रंगला. झिम्बाब्वेच्या सगळ्याच गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. पहिल्या २ चेंडूंवर ७ धावा आल्या. त्यामुळे ४ चेंडूंमध्ये ४ धावा असं सोपं समीकरण असताना पाकिस्तानी संघ एका धावेनं पराभूत झाला. त्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here