‘दरवेळी आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. एसआरएने कळवलं आहे की किशोरी पेडणेकर यांचा यामध्ये संबंध नाही. मात्र तरीही वारंवार दबावतत्रांचा वापर सुरू आहे. आमच्यावर वार करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक जरी गाळेधारक बोलला की हा गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे तर त्या गाळ्याला कुलूप लावा. एका सामान्य महिलेला तुमचा एक माणूस त्रास देतोय, येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का?’ असा संतप्त सवाल पेडणेकर यांनी विचारला आहे.
हा गाळा माझा आहे का? संतापलेल्या किशोरी पेडणेकर टाळा घेऊनच रस्त्यावर उतरल्या – the former mayor of mumbai kishori pednekar reached gomata nagar with a lock after the bjp accused of corruption
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोमाता नगरमध्ये किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या गाळा खरेदी केल्याचा दावा करण्यात आला. सोमय्या यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या सर्व घडामोडींनंतर संतापलेल्या पेडणेकर या आज सकाळी हातात टाळा घेऊनच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.