मुंबई : महाराष्ट्रात सद्यस्थितीत ज्या काही तरुण राजकीय नेत्यांची सर्वाधिक चर्चा होते, त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचं नाव अग्रभागी असतं. कमी वयातही मोठी राजकीय प्रगल्भता रोहित पाटील यांच्या बोलण्यातून दिसून येते. तसंच निवडणुकीच्या राजकारणातही रोहित पाटील यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी दिग्गजांना धोबीपछाड देत आपल्या गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. याच रोहित पाटील यांच्या मुत्सद्दीपणाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरील मुलाखतीदरम्यान रोहित पाटील यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तुमचा आवडता नेता कोण, असं विचारत अजित पवार की शरद पवार असे दोन पर्यायही देण्यात आले. अडचणीत आणणारा हा प्रश्न विचारला जाताच रोहित पाटील यांनी अत्यंत खुबीने त्यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘शरद पवारसाहेबांनाही एका मुलाखतीत ठाकरे कुटुंबातील दोन सदस्यांबाबत असाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ठाकरे कुटुंब असं उत्तर दिलं होतं. तुम्ही जे दोन पर्याय मला दिले आहेत, ते दोन्हीही माझे आवडते नेते आहेत. त्यामुळे मी पवार कुटुंबीय असं उत्तर देईल. मात्र त्यातही तुम्हाला कोणतं तरी एकच नाव हवं असेल तर पवारसाहेब हे माझे आवडते नेते आहेत,’ असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बस, दोनशे प्रवासी उडणार, गडकरींनी मुंबईकरांना नवं स्वप्न दाखवलं

राज्यात की केंद्रात काम करायला आवडेल?

रोहित पाटील यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगलीतील कवठे-महांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. या पार्श्वभूमीवर तुम्हाला राज्यात की केंद्रात काम करायला आवडेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, ‘आपण कुठे काम करायचं हे स्वत:ला ठरवता येत नाही, ते लोकंच ठरवत असतात. मात्र आता तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर मला राज्यात काम करायला आवडेल,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here