पुणे : पुण्यातील खेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “माझे माशाचे गिऱ्हाईक पळवले”, याच्या रागातून दोघांनी शेजारी असणाऱ्या दुकानाच्या मालकावर मासे कापायच्या कोयत्याने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुला मारूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही”, असे म्हणत त्या दुकानदारावर वार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या (रा. शिंपीआळी, राजगुरु नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. सोयल रफिक मोमीन (वय २६ वर्ष, रा. मोमीन आळी, राजगुरुनगर) हा यात गंभीर जखमी झाला आहे. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. अजितदादा की पवारसाहेब, आवडता नेता कोण? अडचणीत आणणाऱ्या प्रश्नावर रोहित पाटलांचं भन्नाट उत्तर खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड बाजारपेठेत हे दोघेही मासे विक्री करतात. दोघांचेही शेजारी शेजारी दुकान आहे. दुकानवरचे ग्राहक तिकडे गेल्यावर ग्राहकाला फुस लावतो, तसेच कमी दराने मासे विक्री करुन आमचे ग्राहक पळवतो, असा संशय दुसऱ्या विक्रेत्याला निर्माण झाला. शुक्रवारी सायंकाळी देखील असाच प्रकार घडला. त्यावेळी दुसऱ्या आरोपी विक्रेत्याने थेट दुसऱ्या दुकानदाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “माझं गिऱ्हाईक पळवतो, तुला आता मारुनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही”, अशी धमकी देत, मासे कापायाच्या कोयत्याने दुसऱ्या विक्रत्यावर वार केले. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
कोणी विकाऊ नाही… रवी राणांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत | गुलाबराव पाटील