नगर: जिल्ह्यात आज दिवसभरात ४८ बाधित वाढले असून त्यापैकी तब्बल ३६ बाधित हे तालुक्यातील आहेत. त्यामुळे संगमनेरमधील करोना नियंत्रित आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर अद्याप कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा आता १ हजार १२४ वर गेला आहे. ( )

वाचा:

राज्याचे महसूलमंत्री यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यात सुरुवातीपासूनच करोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात नगर शहराच्या पाठोपाठ सर्वात जास्त करोनाचे रुग्ण हे संगमनेर तालुक्यात आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही संगमनेर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच प्रशासनाकडून सुद्धा येथील करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र, आज पुन्हा एकदा या तालुक्यात तब्बल ३६ करोना बाधित आढळले आहेत.

वाचा:

आज जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ४१ जणांचे अहवाल हे करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, खासगी प्रयोगशाळेत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात आज एकूण ४८ रुग्ण वाढले आहेत. या रुग्णांमध्ये नगर शहरातील ६, अकोले तालुक्यातील ५, राहाता तालुक्यातील एक व संगमनेर तालुक्यातील तब्बल ३६ रुग्णांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात आज वाढलेल्या ३६ रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील रुग्णांची संख्या १३ असून उर्वरीत २३ रुग्ण हे तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील आहेत.

वाचा:

दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा हा १ हजार १२४ झाला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७२७ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर, करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३० जणांचे मृत्यू झाला असून सध्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३६७ आहे.

आज झाले ६२ जण करोनामुक्त

नगरमध्ये जुलै महिन्यात करोना बाधित वाढण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र बुधवारी एकाच दिवशी तब्बल ६२ जणांनी करोनावर मात केल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. आज करोनामुक्त झालेल्या ६२ जणांमध्ये चार वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here