भंडारा : दुसऱ्या प्रियकराला गिफ्ट देण्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून पहिल्या प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयानक घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली असून याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ नामदेव वंजारी (वय २२), रा. मौदी पहेला असे जखमी प्रियकराचे नाव आहे.

भंडारा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नीरज पडोळे (वय २४), रा. मानेगाव बाजार याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. हे प्रकरण सुरु असतानाच गोकुल वंजारी या दुसऱ्या मुलाशी प्रेयसीने प्रेम प्रकरण सुरु केले. पाच ते सहा महिन्यांपासून त्याचे प्रेम प्रकरण सुरु होते. दरम्यान, गोकुळने नीरजची साथ सोड असा दबाव सतत आरोपी मुलीवर आणला. तिने ही सर्व माहिती पहिला प्रियकर नीरज याला दिली.

IND vs SA : अपयशी राहुलऐवजी रिषभ पंतला मिळणार का संधी, प्रशिक्षकांनी दिलं थेट उत्तर…
त्यानंतर दोघांनी गोकुळचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे त्याला झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलवलं. तिथे तिने गोकुळला गिफ्ट देते असे सांगून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि रुमालाने हात मागे बांधत कोयत्याने त्याच्या मानेवर हल्ला केला. गोकुळने स्वतःला सावरत डोळ्याची पट्टी काढत तिथून पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी अल्पवयीन प्रेयसी आणि तिच्या पहिल्या प्रियकराला अटक केली असून याप्रकरणी प्रेयसी सह नीरज पडोळे याच्या विरुद्ध भा.दं.वि ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोकुळ याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.

महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली, पण नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here